Sunday, October 11, 2026

कामपलीकडची माणसं.. Nostalgic Accident memory..!!

आपल्यावर अडचण येते तेव्हा खरी माणसं कळतात. motorcycle च्या कृपेने या अडचणी पण जवळून बघितल्या आणि माणसं पण.

लग्न नुकतेच ठरलेले. देवेंद्र आणि मी मोटर सायकल वर फिरत असताना दोघांचा accident झालेला. तो bed ridden आणि मला बऱ्यापैकी मुकामार. डॉक्टर, बाबांचा जिगरी मित्र. Operation च्या वेळी आधी त्याने लग्नाची तारीख विचारली. लग्नाला पाच महिने होते. "लग्नाच्या आदल्या दिवशी पर्यंत तुझ्या नवऱ्याला ठणठणीत करतो" म्हणाला. मनात सतराशे साठ विचार घोंगावत असायचे तेव्हा. 

आमच्या team मध्ये एकाच वेळी चौघांचे लग्न ठरलेले त्यामुळे ऑफिस मध्ये एकदम लगीनघाई वाला माहोल होता. लग्नापासून हनीमून च्या सुट्ट्यांपर्यंत चौघांच्या सुट्ट्या कशा adjust करायच्या यासाठी पण meeting. Break मधे लग्नाच्या आहेर आणि खरेदीपासून, नवीन माणसांचे स्वभाव, फिरायला जायची ठिकाणं याच चर्चा चालू होत्या रोज. त्यात एक दिवस ही सगळी गडबड आणि बोलायचे विषयच बदलले एकदम.

त्या वेळी Second shift चा project होता. ऑफिस १० वाजता सुटायचे. सोलापूर हायवे पूर्ण ट्रक च्या वर्दळीचा. मी घरून ऑफिस ला रोज मोटर सायकल वर जायचे तेव्हा. हे accident चे कळल्यावर माझ्यापेक्षा बाकी टीम मधले जास्त विचार करायला लागले. आणि लगेच चहाच्या टेबल वर फर्मान. "लग्न होईपर्यंत रोज तुला ऑफिस ला न्यायची आणायची जबाबदारी आमची. काळजीत नाही, रोज हसत उभी राहिली पाहिजेस." पुढचे पाच महिने एकही दिवस न चुकता राहुल, प्रितेश, विनोद कोणी ना कोणी मला न्यायला आणि सोडायला यायचे. माझ्या आई , बाबांनी पण कधी पुरुष सहकारी म्हणून कधी शंका घेतली नाही. उलट आता पण हा ब्लॉग वाचताना पण म्हणत असतील, चांगली माणसं भेटत गेली पोरीला. या मुलांनी त्या वेळेला केलेल्या मदतीला, गरज असताना दिलेल्या मानसिक आधाराला मी कधीच नाही विसरू शकत. हा एक प्रसंग झाला जो लग्नामुळे जास्त लक्षात राहिला. असे कित्येक वेळा माझ्या मोटर सायकल धडपडीतून सावरणारी, रात्री अकरा वाजता दवाखान्यात नेऊन मलमपट्टी करणारी आणि त्याच बरोबर driving lessons देत motivate करत राहणारी हीच टीम होती. 

Corporate म्हणजे politics असे बरेच जण म्हणतात. माझ्या नशिबाने मात्र मला चांगली माणसं भेटत गेली. नवरात्राच्या निमित्ताने या विषयावर लिहायचे ठरवल्यावर या मुलांची आठवण झाली नाही असं होऊच शकत नाही. ज्या corporate life ने कठीण प्रसंगात अशी चांगली माणसं भेटवली त्याला दुसऱ्या माळेचे नमन.

No comments:

Post a Comment