Tuesday, May 5, 2026

सावधान.. "चालक शिकत आहे".. (Flashback..)

१५ वर्षापूर्वीची गोष्ट.. "दिवाळीत घेतली तर मोटर सायकल नाहीतर काहीच नाही".. पेशवाई थाटात खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अशी सुरू झालेली चर्चा.. लग्न झाल्यावर दळण कसे नेशील? वजन झेपेल का चालवायला? पण स्कूटी मधे काय वाईट आहे? इथपासून सुरू झालेल्या आमच्या वाटाघाटी शेवटी माफक दोन तीन अटींवर येऊन थांबल्या.. गाडी आपापली ढकलता आली पाहिजे, मेन स्टँड ला लावता आली पाहिजे, गाडी किक स्टार्ट असेल घ्यायची असेल तरी किक मारता आली पाहिजे..
 
थोडा घरून support मिळाल्यावर खरी मजा सुरू झाली.. खरेदी वगैरे ठीक आहे पण मुळात मोटर सायकल येत कोणाला होती? मोपेड येत होती पण बाईक या विषयाचा fantasy सोडली तर काहीच गंध नव्हता.. कार चालवताना क्लच गियर समजले होते पण बाईक चे तंत्र पूर्ण वेगळेच.. शेवटी कुठलाही प्रश्न असो पहिला धप्पा कॉलेज मधल्या मित्रांना.. अलिखित नियम.. आणि प्रतीक लगेच गाडी शिकवायला तयार झाला.. मी आपली गियर खाली वर करताना बॅलन्स सांभाळत प्रयत्न करत होते.. गाडी बंद न पडता गियर टाकण्यापासून सुरुवात झाली.. कधी स्कूटी ची सवय म्हणून डाव्या हातातला क्लच, ब्रेक समजून दाबणे.. क्लच लवकर सोडून गाडी बंद पडणे.. गियर बदलताना बंद पडणे.. turn घेताना धडपडणे.. भसकन दोन्ही पाय जमिनीवर टेकवणे.. प्रतीक शांत पणाने मागे माझी पर्स धरून बसायचा आणि चुका सुधारत राहायचा.. त्यात हे सगळं पुण्यात सदाशिव पेठी टोमणे ऐकत.. पण मग कधी गाडीने स्पीड घेतला कळलं पण नाही.. आपल्या बुडाखाली आपल्या जिद्दीवर घेतलेली गाडी.. motivation मिळणारी पहिली गोष्ट.. एवढी क्रेझ तर नंतर कार घेतल्यावर पण वाटत नव्हती.. बोलणारे दोन्ही बाजूंनी बोलत राहिले.. आपण मनाला पटतं रुचत ते करत पुढे जात राहिलो.. speedometer बघत रहाणं आणि भान ठेऊन बेभान होण.. माझा गियर पडला होता..!!

पुढे देवेंद्र सोबत लग्न ठरल्यावर याच बाईक वर दोघं मोकाट फिरलो.. फिरताना धडपडलो परत सावरलो.. मग इकडे आल्यावर मुंबईतले मोठे रस्ते, किराणा दळण गाडीच्या हॅण्डल ला अडकवून घेऊन येणं, घोडबंदर चा traffic, fly overs, गार्गी बाळ असताना टाकी वर कांगारू बॅग मधे बसवून घेऊन जाण.. मग हळूहळू मागे ओढणी बांधून बाईक वर बसवणं.. आता तर खूपच मोकळी झाली ती.. बाईक ला आणि मला एकत्रच या सगळ्या बदलांची हळूहळू सवय होत गेली.. गार्गी मुळे बेफाम पणाला थोडा लगाम बसला.. थबकायला होतं खरं.. speedometer पेक्षा आता ब्रेक कडे आधी लक्ष जात.. 

आणि ज्या स्वप्नासाठी हा सगळा अट्टाहास केलाय ते विशी मधलं स्वप्न परत परत डोळ्यासमोर दिसायला लागलं.. पण खूप प्रश्न यायला लागले मनात.. जमेल का? तेव्हा हे स्वप्न बघणं सोपं होतं.. पण आता? आई झाल्यावर? चाळीशीत आल्यावर? वजन वाढल्यावर? झेपेल का? एनर्जी टिकेल ना? आपण एकीकडे, मुलगी एकीकडे.. range नाही, बोलणं नाही.. पहाडी घाट वळणाचे रस्ते.. रस्ते नसलेले रस्ते.. नसता उपद्व्याप करतोय का? आधी नशा होती पण आता थोडी anxiety आहे.. 

पण मग आता नाही तर कधी? पहाडी रस्त्यांवर गाडी वर नाही फिरलो तर ती शिकून काय फायदा.. Rider's ची ती तर "काशी".. so finally.. जे होईल ते होईल.. Ready for life changing experience.. passion.. fantasy.. Himalayan Royal Enfield calling.. Spiti Valley full circuit calling.. Asia's highest suspension bridge calling.. Countdown begins..!!

.. अवनी गोखले - टेकाळे 

No comments:

Post a Comment