Friday, July 8, 2022

ढगाआड च मुक्काम त्याचा..

या पावसाळी सकाळी 

संदेश येईच ना "त्याचा"

ती उर्वी सुस्त निद्रिस्त 

ढगाआड च मुक्काम त्याचा 


या पावसाळी सकाळी 

साहवेना दुरावा त्याचा 

उदयाविनाच त्याचा अस्त 

ढगाआड च मुक्काम त्याचा 


या पावसाळी सकाळी 

आषाढ साजरा त्याचा 

आसमंतात उधळला हस्त 

ढगाआड च मुक्काम त्याचा 


या पावसाळी सकाळी 

थेंबोथेंबी भास त्याचा 

इंद्रधनू उमटता मस्त 

ढगाआड च मुक्काम त्याचा 


-- अवनी गोखले टेकाळे 


ता. क. "तो" म्हणजे कोवळ्या उन्हाचा कवडसा.  


2 comments:

  1. आषाढ थेंब थेंबी आणि त्याचे इंद्रधनु होत जाणवणारे अस्तित्व..
    हलकेच जाग मज आली,
    कोवळी किरणे स्पर्शून गेली
    सहज सुंदर रेखाटलेले पावसाळी भावबंध..!✍👌👌

    ReplyDelete