Tuesday, December 28, 2021

मोल अनमोल (१०० शब्दांची काल्पनिक रूपक कथा)

ती जीव ओवाळून टाकायला तयार. त्याला आवडणारे सगळे पदार्थ करून खाऊ घालायची. तिच्या सामान्य रुपावरून नकार दिला त्याने. तीही स्वाभिमानी. मागे वळून पाहिले नाही. 

तिला सासर मिळाले. त्यांची खानावळ. मनापासून ती समरस झाली. आज तिच्या घरगुती डब्याचे सगळ्यात regular customer म्हणजे तो आणि त्याची बायको. त्याची बायको पार्लर मध्ये बिझी. त्याला घरगुती जेवण आवडते म्हणे!!!

तिच्या हातच जेवायला शेवटी त्याला मोल मोजाव लागत होत. तिच्यासाठी मात्र ते नेहमीच अनमोल होत.

-- अवनी गोखले टेकाळे 

No comments:

Post a Comment