माझे नुकतेच लग्न झालेले. महालक्ष्मी च्या सणाला आम्ही सगळे सख्खे चुलत एकत्र बीडला जमलेलो. माझ्या चुलत दिराचे लग्नाचे ठरवणे चालू होते. सणाचा दिवस. त्यात मुलगी बघायला जायचे ठरत होते. मुलगी बघायला जाणार कोण? ही लिस्ट मारुती च्या शेपटी सारखी मोठी मोठी होत चालली होती. नवीन लग्न झालेली मी दबकत सांगायचा प्रयत्न करत होते की अरे एवढे सगळे कशाला गाड्या भरून जायचे. सणाचे दिवस आहेत. मोजके जा आत्ता. मग ठरल्यावर आहोतच की आपण सगळे वर्हाडी आणि वाजंत्री. माझ्या या प्रयत्नांचा परिणाम म्हणून असे ठरले की ही छान बोलते आहे मुद्देसूद, हिला घेऊन जा सोबत. झालं उलटच! सगळ्यांनी गर्दी करू नका सांगणारी, शून्य अनुभव असलेली, नवीन लग्न झालेली मी. एकदम पिटाळले च मला पण मुलगी बघायला. अमोल, काका काकू, चुलत दीर, देवेंद्र, मी. वऱ्हाड निघाले तुळजापूर ला.
कांदे पोहे घेऊन धनश्री आली. आणि सगळ्यात छोटी डिश अमोल ला. अर्र कुछ तो गडबड है दया! त्यामुळेच ते पोहे लक्षात राहिले. अजून पण चिडवत असतो धनश्री ला आम्ही त्यावरून. पण नंतर लग्न होऊन धन्नो घरात आल्यावर आम्हाला कहाणी कळली त्या डिश ची. सोवळ्यात गौरी उभ्या केलेल्या त्या मखराच्या मागे कपाटात सगळी भांडी ठेवलेली. त्यामुळे ती अडचणीत जाऊन काढता येईना. आमचे अचानक जायचे ठरलेले. त्या गडबडीत ही गडबड.
खवय्ये असलेल्या आमची नुसती परत येताना पोह्यावरच चर्चा. खरंच झकास बनले होते पोहे. शेंगदाणे चांगले परतले होते, मऊ पण पडले नाहीत आणि करपले पण नाहीत. पोहे नेमके भिजले होते. गच्च गोळा नाही आणि फडफडीत पण नाही. लिंबू, मीठ मिरची सगळे अचूक. पोह्यांवर चर्चा पूर्ण तुळजापूर ते बीड. पहिल्यांदा इतकी चर्चा पोह्यांवर रंगली असेल. या कार्यक्रमाला कांदे पोहे कार्यक्रम का म्हणत असतील ते तेव्हा कळलं. इतके बडबड करत होतो आम्ही पोह्यांवर.
अरे कोणीतरी मुलाला विचारा रे! पोहे करणारी आवडली का ते. त्यांना आयुष्य काढायचं आहे आणि आपलं पोहे पुराण संपेच ना. मग काय. कहाणी सुफळ संपूर्ण. अमोल ला छोट्या डिश मध्ये परत परत वाढलेले कांदे पोहे आणि ते वाढणारी आवडून गेले एकदम. होकार येईपर्यंत रोज म्हणायचा आज माझे प्रोफाइल visit केले पहाटे सहा वाजता तिने म्हणजे विचार करते वाटत ती पण. दिल गार्डन गार्डन.
मुला मुलीने काय विचार केला असेल तो त्यांनाच माहित. आम्ही आपले येणारी मुलगी आपल्या आचरट धिंगाण्या मध्ये मिक्स होऊ शकते या एवढेच पाहिले. जाऊ नाही तर मैत्रीण होऊ शकते का हे पाहिले. पोरगी पटली. आणि आता चविष्ट पोहे खायला मिळणार पुढच्या महालक्ष्मी च्या वेळी म्हणून अजून आनंदात. शेवटी काय. अन्नपूर्णा मन जिंकते हे पटले. नंतर आम्हाला कळले की ती पोहे बनवणारी अन्नपूर्णा तिची आजी होती. फिकर नॉट. अन्नपूर्णे ची नात अन्नपूर्णा च असते की.
पोहे सुपरहिट. पोरगी सुपरहिट. आमच्या टेकाळे जोडी गँग मधल्या सगळ्यात छोट्या जोडी ची entry झाली आणि गँग पूर्ण झाली. या जोड्यांबद्दल बोलण्यासारखे खूप काय आहे. ते पुढच्या वेळी. आज आत्ता इथेच थांबते. भूक लागली. पोह्याबद्दल नुसते लिहायचे नसते. ते खायचे पण असतात. टाइम प्लीज घेऊन जाते खायला. तोपर्यंत तुम्ही सांगा कॉमेंट मध्ये. कांदे पोहे ची तुमची आठवण.
-- अवनी गोखले टेकाळे
thnk u dear amchya baddal write kele mhanun saglya jau baini mast manmokle karun adjust kele mala ki kadhi tumchyat mislun gele samjle ch nahi... pn kande pohe tr mala pn lakshat hote pn itke chan explain karta ale naste thnks dear
ReplyDeletethank you dhanashree. apali javanchi unique maitri ahe. ashi khup kami pahayla milate. nahitar manpan ani kuchkuch bhandanatch ardhya baykanche ayushya jate. we are lucky to have this bond in family.
Deleteअवनी ताई, भन्नाट.!
ReplyDelete😘😘
thank you
Deleteछान रंगले पोहे किस्से...कधी यावे खायला??
ReplyDeleteही नाती आणि मैत्री अशीच राहो...
thank you. kadhi pan ye g pohe khayla. ani tuzya natyat koni ahe ka lagnache apan karu kande pohe arrange. :)
DeleteAtishay surekh lihile ahe!!👌👌👌👌
ReplyDeleteyess. thank you
DeleteKhup Chan lihile 👌👌👌
ReplyDelete