तिला कधीच नाही वाटत. तो शेजारी असावा. जवळ असावा किंवा मिठीत असावा. पण तरीही तो जगाच्या पाठीवर कुठेतरी जिवंत असावा असं मात्र वाटतं तिला. कारण त्याच्यामुळे तिला ती स्त्री असल्याची जाणीव होते. अगदी आतून उमलून आल्यासारखे वाटते तिला. असा तो. ती जाणीव आयुष्यभर कायम राहावी असं वाटत तिला. आणि म्हणूनच तो असावा अस्तित्वात कायम अस पण वाटत तिला.
तो कोण? एखाद्या तिचे पहिले क्रश. एखाद्या तिचा हृतिक रोशन बँग बँग म्हणणारा. एखाद्या तिचा विराट कोहली सपासप रन काढणारा. एखाद्या तिचा तो एक कोणीतरी. तुमचा तो कोण? हे वाचल्यावर जो तुमच्या नजरेसमोर आला आणि उगीच गालातल्या गालात हसू आले तोच. स्त्रीत्वाची जाणीव करून देणारे एखादे हलकेसे मृगजळ. हवे हवेसे. एखादा अल्लड वेडेपणा. पण तरी तेवढेच त्याचे स्थान. त्याची जागा तेवढीच. बाकी तिच्या रोजच्या आयुष्यात त्याला थारा नाही. तिच्या मनाची कुंपणे तिने घातलेली. ती फक्त समाधानी त्याला कधीतरी कुठेतरी एक झलक पाहून. तेव्हढेच काय ते तिचे त्याच्याशी बंध.
ती हे विचार करते म्हणजे ती व्यभिचारी नाही बरं. ती सुखी आहे बरं तिच्या विश्वात. तिच्या आयुष्यात. तिच्या संसारात. तिच्या मर्यादा तिला माहित आहेत. नव्हे तिला कधी गरजही वाटत नाही त्यांचे उल्लंघन करायची. तिला पूर्ण माहित आहे की हे फक्त मृगजळ आहे. त्याची तिच्या आयुष्यातील जागा फक्त एवढीच. कधीतरी ती फार अस्वस्थ असताना त्याची एक झलक तिला दिसली तर तिच्या चेहऱ्यावर एक हलके हसू येईल. निर्व्याज. आणि ती परत प्रफुल्लित होईल. मोगऱ्याच्या नुकत्याच उमललेल्या फुलावर पाणी शिंपडावे अलगद तशी. आणि गोल फिरून तिच्या विश्वात, तिच्या कोशात अलगद परत जाईल. तिची अस्वस्थता दूर सारून परत एक ठेहराव येईल. बाकी कोणाला हे भावविश्व कळणार पण नाही. ते कळावे अशी तिची अपेक्षाही नाही. अचानक तिला खुललेले बघून कोणी विचारेल तिला. काय झाले? ती मोकळे हसून म्हणेल फार काही नाही. "मोगरा अजून तरी कोमेजला नाही". ती खुश का झाली अचानक. कारण कळणार कोणालाच नाही. तिला तरी कुठे काय कळते आहे? ती फक्त तरंगत लहरत असते. आणि क्षणात परत स्थायी भाव घेऊन कर्तव्य भावनेत येते. ती कोण? नाव नाहीच तिला. तो कोण? हा काय प्रश्न आहे? इतके वाचून पण आला नाही का कोणीच तुमच्या नजरेसमोर? तोच तो तिचा हिरो. तिचा क्रश. जिच्या तिच्या मनातला हृतिक रोशन. मोगरा फुलायला अजून काय पाहिजे.
-- अवनी गोखले टेकाळे
Very well written. What i like more is it's about nice feeling...not love but kind off...it's not taking away you from your dear ones and not in your mind 24x7. So the feeling which gives some hopes and smile is nice....
ReplyDeletethank you g. tu push kela mhanun publish kela khara tar ghabarat ghabarat
Deleteखूप छान लिहिलस. मनस्वी..पहिला क्रश.🌹🌹
ReplyDeletethank you geeta
Delete