महिला दिनाचा हा फोटो पाहिला आणि त्यावरून काही ओव्या सुचल्या. देवेंद्र आणि त्याचे पाच चुलत भाऊ अशा आमच्या सहा जोड्यांना एक एक ओवी डेडिकेट केली आहे. ओवी हा लेखनाचा प्रकार पहिल्यांदाच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, फार काही नियम माहित नाहीत. त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी.
पहिली आमची ओवी ग, रामकुंड क्षेत्री ग
टेकाळ्यांचे दळण दळतो, रामाई च्या नावानं ।।१।।
दुसरी तिची ओवी ग, लातूरचा "आकार"
"प्रसन्न"तेने दळण दळते, स्टेथोस्कोप गळ्यात ।।२।।
तिसरी तिची ओवी ग, लंडन ची वारी ग
टेक्निकल दळण दळते, "गजानना"च्या साथीनं ।।३।।
चौथी तिची ओवी ग, शिक्षणाचे माहेर ग
मास्टर शेफ च्या घरात खुलतो रामाईचा "प्रसाद" ।।४।।
पाचवी तिची ओवी ग, उड्डाणाला कुवेत ग
निर्मळतेला कवेत घेतले "सचिन" च्या साथीनं ।।५।।
सहावी माझी ओवी ग, मुंबापुरी माया ग,
"देवेंद्र"चे दळण दळते, सरस्वती हातात ग ।।६।।
सातवी तिची ओवी ग, बंगलोर मेट्रो सिटी ग,
संसाराचे दळण दळते, तिचे मोल "अमोल" ग ।।७।।
आठवी आमची ओवी ग, महालक्ष्म्यांच्या कृपेनं
ज्येष्ठा कनिष्ठा दळण दळती, गणरायाच्या साक्षीनं ।।८।।
नववी आमची ओवी ग, आता पुढचे पाऊल ग
नवरस अंगी घेऊन आम्ही, नवदुर्गा या होऊ ग ।।९।।
दहावी आमची ओवी ग, हातात आले स्टेरिंग ग
सीमोल्लंघन करू सोबत, विजयाचा हा दसरा ग ।।१०।।
-- अवनी गोखले टेकाळे
Apratim!!!!!👌👌👌👌👌
ReplyDeletethank you vinaya
DeleteKhupch sunder👌👌👌
ReplyDelete