ऑफिस, काम सोडून इतर पण बऱ्याच विषयांवर बोलायचो ब्रेक मध्ये.. त्यात घर, मुलांवर बोलणारा तो एकटाच.. काही गोष्टी तेव्हा फक्त ऐकल्या.. समजल्या जरा नंतर..
वाढदिवस विषय निघाला होता एकदा.. तो जे बोलला ते कायमचं डोक्यात राहिलं.. आवडलं.. पटलं..
मुलांचा वर्षाचा वाढदिवस म्हणजे पालकांचीच हौस.. हॉल घेतलेला.. थीम प्लॅन.. फुगे, बलून, बार्बी चा केक सगळे जागच्या जागी.. हॉल भरून पाहुणे.. भोंगा काढलेले लेकरू आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करून थकलेले आई बाप.. त्यापेक्षा म्हणाला मी विचार केला.. काहीतरी बदलायला पाहिजे.. आणि मग ठरवले.. मुलीचे वाढदिवस पाच वेळाच साजरे करायचे.. पण करायचे ते चांगले दणक्या.. आपल्याला आणि मुलीला कायम लक्षात राहतील असे.. ते वयच असतं तस.. पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस..
पाच.. pre school संपत आलेली.. आता मैत्रिणी बदलणार.. जग बदलणार.. मोठ्या शाळेत जाणार.. ती आणि तिचे मित्रमंडळ.. सेलिब्रेशन तो बनता है..
दहा.. primary संपत आलेली.. आता हायस्कूल चे वारे.. परत एकदा मैत्र बदलणार.. जग बदलणार.. सेलिब्रेशन तो बनता है..
पंधरा.. शाळा संपत आलेली.. मोठी झाली आता.. शहाणपण आले.. आता कॉलेज चे वारे.. परत एकदा मैत्री चे अर्थ बदलणार.. जग बदलणार.. या शाळेतल्या मैत्रिणींबरोबर सेलिब्रेशन तो बनता है..
वीस.. कॉलेज संपत आलेले.. फुलपाखरू हृदयातले मनमानी करी.. परत नवे अर्थ.. बदलत जाणारे जग.. पिसा सारखी घरभर फिरणारी मुलगी.. आरशात बघत मुरडणारी.. आता परत जग बदलणार.. सेलिब्रेशन तो बनता है..
पंचवीस.. नोकरी ला लागलेली.. समजूतदार.. नवे अर्थ.. नवे जग खुणावत आहे आता.. तिचे जग.. अरे संसार संसार.. कदाचित आपल्या घरातला हा शेवटचा वाढदिवस.. बोलवावे सगळ्या मित्र मंडळी ना घरी.. काय सांगावे यातच जावई असायचा एखादा.. सेलिब्रेशन तो बनता है..
तीस.. मुलगी आई होणार आता.. good news आली तिची.. तिच्याकडे जायला पाहिजे.. आता पुढच्या पंचवार्षिक योजना ती पार पाडेल.. परत एकदा घड्याळाला किल्ली.. पाच.. दहा.. पंधरा.. वीस.. पंचवीस.. सेलिब्रेशन तो बनता है..!!!
आज हे सगळं का आठवलं माहित नाही.. डोक्याचे पोतडे आहेच तसे.. कधी काय आठवेल सांगता येत नाही.. कधी कुठली आठवण नवा अर्थ घेऊन येईल सांगता येत नाही.. अरे हो, गार्गी पण पाच ची होईलच की थोडे दिवसात.. आम्ही पण किल्ली देऊन ठेवली आहेच की घड्याळाला.. पाच दहा पंधरा वीस पंचवीस.. सेलिब्रेशन तो बनता है..
-- अवनी गोखले टेकाळे
Zakkas.. awadlay
ReplyDelete