Sunday, November 22, 2020

त्यांचे कामच ते

त्यांचे कामच ते.. त्यांनी हसवायचे सगळ्यांना पोट दुखेपर्यंत.. नकला करून, गमत्या करून.. समोर असताना.. समोर नसताना.. सगळ्यांनी हसायचे त्या आठवणी काढून.. पोट दुखेपर्यंत..
गेल्या काही वर्षात आपण पण प्रयत्न केला त्यांना हसवायचा.. नाही जमलं.. खूप कठीण.. खूप अवघड.. नाही झेपल हसवायला.. मान्य.. एकदम मान्य.. ते नाही जमलं आपल्याला.. त्यांचेच काम ते.. पण आपल्याला जे जमत ते आपण करत राहायचं.. आपल्याला हसायला तर जमत.. आपण हसत राहायचं.. समोर असताना.. समोर नसताना.. सगळ्यांनी हसायचे त्या आठवणी काढून.. पोट दुखेपर्यंत..
त्यांना कधीच आवडणार नाही.. आपण रडलेले.. आपण चिडलेले.. आपण रुसलेले.. आपण कान हलके केलेले.. आपण समज गैर समजाच्या भोवऱ्यात सापडलेले.. आपण तेच करायचं जे त्यांना वाटत होत.. आपण एकत्र रहायचं सगळे कायम.. "खब" करायचा.. त्यात ठेचा मिक्स करायचा आठवणीने.. एकत्र जेवताना वाटेल ते पांचट जोक मारत जोरजोरात खिदळायचं.. इतके दिवस त्यांना हसता येत नव्हते ना प्रकृती मुळे.. आता हसतील ते मनमोकळे या फोटोत हसत आहेत तसेच.. जिथे आहेत तिथून.. आपले हे दृष्य पाहून.. आणि मनमोकळे आवाज देतील जिथे असतील तिथून… सॅच, गॉट, पोश, आस, टिंग, गोज, बिट्स, सॅन्ज, पिंटन..!!! 
समोर असताना.. समोर नसताना.. सगळ्यांनी फक्त हसायचे त्या आठवणी काढून.. पोट दुखेपर्यंत.. 

-- अवनी टेकाळे 

No comments:

Post a Comment