रक्तमित्र आणि रक्तदान
आज परत एकदा रक्तदान हा विषय चर्चेत आला आणि एक विचार डोक्यात आला.. आपल्या कुटुंबात शेकड्याने माणसे, मित्र परिवार पण तसा भक्कम.. पण तरी अडीअडचणीला आपल्याला यातल्या किती लोकांचे ब्लड ग्रुप माहित आहेत? त्याहून महत्वाचे गरज पडली तर त्यातले किती जण खरंच रक्तदान करायला इच्छुक असतील? मग असा विचार डोक्यात आल्यावर फार वेळ घालवत नसतोय आपण. तर एक लिस्ट बनवायला घेतली आहे ज्यामध्ये इच्छुक रक्तमित्राचे पूर्ण नाव, त्याचा ब्लड ग्रुप, त्याचे निवासी शहर अशी थोडक्यात माहिती गोळा करत आहे.. रक्तदान करण्यास "इच्छूक आणि पात्र मित्रांनी" पर्सनल कॉन्टॅक्ट करून माहिती द्यावी..
आणि हो, ते खरंच डोनेशन करणार असाल तर माहिती द्या.. कसं आहे ब्लड कॅम्प मध्ये काही लोक नुसते बोटाला टुचुक करून घेऊन हिमोग्लोबिन चेक करून घेतात फुकटात आणि जाता जाता वजन काट्यावर चढ उतार करतात.. तसे काही नको आपल्याला..
अनेक सेवाभावी संस्था, ब्लड बँका हे काम करतातच.. तर आपण कशाला हा नसता खटाटोप करायचा हे अगदी मान्य.. पण अचानक वेळ आलीच तर काखेत कळसा गावाला वळसा नको व्हायला म्हणून एक छोटा प्रयत्न.. आणि तसं पण थोडी वेडसर आहेच मी आणि बिनकामी बरेच उद्योग करत असते हे एव्हाना कळले असेलच.. त्यातलेच हे एक समजा.. माझ्या या वेडात तुम्ही सहभागी होणार का? आपण परिवार आहोतच.. रक्तमित्र बनू शकतो का?
ता. क. काही खात्रीशीर जोडलेली माणसे आणि त्यांचे ब्लड ग्रुप आहेत लिहिलेले माझ्याकडे.. आणि मी स्वतः B+ve आहे. हिमोग्लोबिन आणि वजन दोन्ही भलेभक्कम आहे. रक्तदान करण्याचा अनुभव आहे.
या गोष्टीची गरज पडू नयेच आयुष्यात कोणाला पण पडलीच तर आठवण ठेवा.
-- अवनी गोखले टेकाळे
Nice initiative!
ReplyDeleteJaideep Dole: B+ve
खूप सुंदर उपक्रम हाती घेतला आहे.
ReplyDeleteमी मुंबई पासून ४०० किमी अंतरावर रहातो. माझा या उपक्रमाला कितपत उपयोगी होईल, याबद्दल मी साशंक आहे. तरीही समावेश करणार असाल, तर अगोदर माझा रक्तगट माहित करून घेतो आणि मगच सविस्तर तपशील देतो..आणि उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा.