Sunday, June 7, 2020

मारवा..

पाय मुडपून उभा गिरीधर, 
मथुरेत वाजवी पावा.. 
गोकुळात थबकली नार,
गंधाळून गेली हवा.. 
दूर राऊळ, नदीपार, 
कुणी झंकारे मारवा.. !!

सायंकाळी क्षितिजा पार,
निघाला पाखरांचा थवा.. 
थबकला माझ्या तरुवर,
नकळत एक चुकार रावा.. 
दूर राऊळ, नदीपार,
कुणी झंकारे मारवा..!!!




No comments:

Post a Comment