पहिल्या ब्लॉग पासून १०० ब्लॉग पूर्ण झाले त्या लेखन प्रवासाबद्दल थोडेसे..
तशी शाळेत असताना मराठी विषयात ढ असणारी मी एवढे कधी कसे लिहायला लागले हा एक मलाही न सुटलेला प्रश्न आहे.. पहिल्यापासून शाळेत आवडीचे विषय म्हणजे गणित, विज्ञान आणि संस्कृत.. मराठी वाचायची आवड शाळेत असल्यापासून भरपूर.. पण लिहून पहिले नव्हते कधी.. लिखाणाची मजल म्हणजे परीक्षेत निबंधलेखन एवढेच काय ते..
या गणित आणि विज्ञानाने engineering चा मार्ग दाखवला.. आणि मग हळूहळू जगाची ओळख व्हायला लागली.. कोषातून बाहेर पडत गेल्यावर हळूहळू विचारचक्र धावायला लागलं.. ते कधी न थांबण्यासाठी.. second year ला असताना पहिली कविता लिहिली.. आणि मग वहीच्या मागच्या पानावर खर्डेघाशी करायला सुरवात झाली.. मग या कविता खास मैत्रिणींना night out च्या वेळेस वाचून दाखवणे सुरु झाले..पण मग त्या त्या वर्षाच्या रद्दीबरोबर काही कविता प्रवाहाला लागायला लागल्या.. मग m.tech ला असताना blogger वर अकाउंट काढला वर्ष २००९.. आणि एखाद एखाद कविता ब्लॉग वर लिहायला सुरवात केली..
मग हळूहळू ऑफिस, घर, संसार या सगळ्यामध्ये रमत गेले.. कधीतरी लिहायचे ब्लॉगवर.. कॉलेज मधल्या मित्र मैत्रिणींना whats app वर लिंक द्यायचे वाचायला..
गेल्या ३ वर्षात मुंबई लोकल चा प्रवास सुरु झाला आणि माझा हा छंद खऱ्या अर्थाने बहरला.. लोकल मध्ये रोजची ७० मिनिट.. जाताना ३५ येताना ३५.. कधी बसायला जागा मिळते तर कधी लटकून जायला लागते.. सुरवातीचे काही दिवस या सगळ्याशी जुळवून घेण्यात गेले.. या मुंबई च्या lifeline ने खूप वेगवेगळ्या माणसांना भेटवलं.. एका वेगळ्या जगाची ओळख करून दिली.. आणि मग ठरवलं me time मिळवायचाच आणि तो पण इथेच या ट्रेन मध्ये.. मग कधी knitting च्या सुया हातात आल्या तर कधी वाचायला पुस्तक.. कधी हेडफोन लावून गाणी ऐकत वेळ जायचा.. आणि मग लिहायला सुरवात केली.. आणि या एक वर्षात सातत्य वाढले.. वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्यात आले.. कधी कविता, कधी लेख, कधी चारोळ्या विचार धावत गेले ..
मग हळूहळू हे लिखाण मित्र मंडळींसोबतच घरातल्या मंडळींसोबत share करायला सुरवात केली.. प्रोत्साहन मिळत गेले आणि मग थोडा हुरूप आला.. website वर लिहायला सुरवात केली.. momspresso या website मुळे पहिल्यांदा लिखाण large forum वर लिखाण मांडायची संधी मिळाली.. मग ईरा, storymirror, pratilipi, माझे पान ही आणि अशी व्यासपीठं मिळत गेली.. लेखणी बहरत राहिली.. खूप चांगले नवीन साहित्यिक मित्र मैत्रिणी मिळाले.. यांच्या मार्गदर्शनामुळे दिशा मिळत गेली.. स्पर्धात्मक लिहायला सुरवात केली.. फेसबुक वर स्वतःचे page काढून स्वतःचा एक वाचकवर्ग तयार करायला सुरवात केली.. youtube वर स्वतःचा channel सुरु केला.. यातली कुठलीच गोष्ट ठरवून किंवा कुठल्याही हेतूने केली नाही तर सहज रित्या ते होत गेले..
सर्वात प्रथम २००९ मध्ये जो ब्लॉगर वर अकाउंट सुरु केला तोच अजूनही सुरु आहे.. कुठल्याही website वर लिहायचे असेल तरी सर्वात प्रथम ते आपल्या स्वतःच्या ब्लॉग वर लिहून ठेवते.. कॉलेज मधल्या हरवलेल्या कवितांतून जो धडा घेतला तो आजपर्यंत.. या ब्लॉग वर वेगवेगळे label लावून लिखाणाची वर्गवारी करायचा प्रयत्न केला आहे.. या वर्गवारी मध्ये कविता, चारोळ्या, शेर, लेख, कथा, विचार, आवाज, पाककला. छंद, १०० शब्दांची गोष्ट, संस्कृत मधील स्तोत्रांची केलेली भाषांतरे(अमृतवाणी), चित्रवर्णन, पत्र, आठवणी असे बरेच प्रकार आहेत.. यातील प्रत्येक ब्लॉग चा विषय, आशय दुसऱ्या ब्लॉग पेक्षा वेगळे आहे..
आणि बघता बघता गाठली शंभरी.. आता पुढे काय? माहित नाही.. एवढे लिहिले ते पण हातून का आणि कसे घडले कळत नाही.. खाजगी डायरी चे स्वरूप देऊन सुरु केलेले ब्लॉग्स कधी सार्वजनिक झाले तेही कळले नाही.. आता या सगळ्यात एक वाचक म्हणून तुमची साथ मोलाची.. तुमचे अभिप्राय देत रहा.. सगळे संकलन वाचत रहा.. नवीन नवीन विषय घेऊन नेहमीच येत राहीन तुमच्या साठी.. माझ्या याच ब्लॉग वरून.. तुमचेच रहाट गाडगे वाचत रहा माझ्या नजरेतून.. अवनी गोखले टेकाळे
https://avanigokhale.blogspot.com/
Wow.... what a inspiring journey. I must say....you have chosen opt way to find out your me time and you are using it for a noble cause. Go ahead. My wishes are with you. Soon this 100 will be converted into 1000 and then more ......more. All the best.
ReplyDeleteThank you Neelima.. tuzyamule khup protsahan milte mala..
DeleteHey congrats dear.. and keep it up.. tu kharach khup chan lihites.. sadhec.. nehemiche c vishay astata.. pan te chan aani sopya shabdat mandates te mala khup aavdte.. jevan Jamel tevan me tula bhetlis ki sangitlac aahe pan kahrac aasa ekadha Chand aasava c... Khup mast.. aashi c chan chan lihit ja aani share kart ja.. mala khup aavdel vacahyala...
ReplyDelete