इथले डबे म्हणजे कसे.. सगळे नखरे संपलेले.. काही परवडत नाही रोज बाहेरच म्हणणारे, काही सोसत नाही रोज बाहेरच म्हणणारे.. रसगुल्ले, इडिअप्पम, सांबर भात, सरसो का साग सगळेच सोबत.. फिश करी आणि पुरण पोळी शेजार शेजारच्या ताटात.. Batchelor मुलांचे आणि नवीन लग्न झालेल्या मुलींचे प्रयोगशील डबे, नवीन लग्न झालेल्या मुलांचे गपगुमान डबे, localite मुलांच्या आयांनी दिलेले चविष्ट डबे.. मग छान छान करत एकमेकांच्या डब्यावर ताव मारणे, रेसिपी विचारणे.. खूप दिवसात भरलं वांग नाही आणलं ग.. अशी प्रेमळ फर्माईश केलीही जाते आणि ती पूर्ण पण तितक्याच उत्साहात केली जाते.. राजकारण, क्रिकेट, movies, थोडी gossips, आजूबाजूची हिरवळ, फॅमिली गपशप अशा गप्पा रंगत जातात.. आणि डब्बा चविष्ट की गप्पा या विचारात परत सगळे निघतात.. "back to work"
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment