मी लिहिलेली चकोर ही कविता सादर करत आहे.. कवितेचा सारांश - एक मुलगी.. सतत चंद्राची आराधना करणारी.. एक दिवस प्रसन्न होऊन तो तिला भेटायला पृथ्वी वर येतो.. तिच्या समोर उभा राहतो.. आणि वेडे जग त्या दिवसाला अमावस्या म्हणते..
"चकोर"
तो येतो बंधने झुगारत,
तो येतो रस्ते तुडवत,
तो आज फक्त तुझा.. तुझ्यासाठी..
नभांगणातून ठाकला तो समोर,
तू अनवट, प्रफुल्ल भावविभोर,
तो आज फक्त तुझा.. तुझ्यासाठी..
वेडे जग काळा माथा बघते,
आज अमावस बोलून जाते,
तो आज फक्त तुझा.. तुझ्यासाठी..
तो अवतरला आज चकोर,
तो प्रकटला तुझ्या समोर,
तो आज फक्त तुझा.. तुझ्यासाठी..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment