Monday, January 20, 2020

काळा मसाला की aroma therapy

आजकाल कोण करत बसत असला खटाटोप.. सरळ जायचं आणि एखादं पाकीट विकत आणायचं मसाल्याचं.. म्हणजे २-३ वर्षांपूर्वी पर्यंत माझं पण असंच मत होतं.. पण एकदा गम्मत म्हणून सांबार मसाला बनवून बघितला घरी .. आणि काहीतरी वेड लागल्यासारखी मी मसाले बनवायच्याच मागे लागले.. का ते मलाही नाही कळलं.. पण तो मसाल्यांचा वास एकदम भरून राहतो घरात म्हणून असेल कदाचित.. fresh वाटत एकदम.. मन प्रसन्न होत आपलंच.. तेवढाच routine मध्ये change.. aroma therapy दुसरी काय असते.. मग सासूबाईंना विचारून विचारून एकदा खास मराठवाडी काळा मसाला पण करून पाहिला.. 
मराठवाडी रस्सा भाज्या काळ्या मसाल्याशिवाय अपूर्णच.. preservative वापरलेले नाहीत, कुठलेही food color वापरलेले नाहीत.. तरीही वर्षभर टिकणारा हा मसाला.. (जिथे जिथे गरम मसाला वापरतो तिथे तिथे हा मसाला वापरू शकतो).. 
हा मसाला बनवायला लागणारे अर्धे खडे मसाले तर आपल्या घरात सहज असतातच.. तर खाली दिलेले पदार्थ वेगळे वेगळे तेलामध्ये परतून घ्यायचे.. आणि मग सगळे मिक्सर मधून दळायचे.. कि झाला काळा मसाला घरच्या घरी तयार.. 
  1. धने पाव किलो.. 
  2. कोरडे खोबरे पाव किलो.. 
  3. सुकी मिरची पाव किलो.. 
  4. हळकुंड 
  5. खडा हिंग 
  6. जिरे १०० ग्रॅम 
  7. शाह जिरे २० ग्रॅम 
  8. दगड फूल २० ग्रॅम 
  9. कर्ण फूल /जावित्री २० ग्रॅम 
  10. मिरे २० ग्रॅम 
  11. लवंग २० ग्रॅम 
  12. दालचिनी २० ग्रॅम 
  13. तमाल पत्र २० ग्रॅम 
  14. मसाला वेलदोडे २० ग्रॅम 
जास्त प्रमाणात मसाला करत असू तर कांडप वाल्याकडून दळून आणता येतो.. किंवा घरी मिक्सर मध्ये पण छान बारीक मसाला दळला जातो.. फक्त मिक्सर मध्ये करणार असाल तर सोपे जावे म्हणून काही बदल करू शकता जसे कि सुकी मिरची, हळकुंड आणि खडा हिंग याच्या ऐवजी घरातले हळद, तिखट आणि हिंग गरम करून घालू शकतो.. तसेच गोटा खोबरे बऱ्याच वेळा खऊट निघते तर त्याच्या ऐवजी desiccated coconut वापरू शकतो.. 

एकदा नक्की करून बघा.. आणि aroma therapy कशी वाटते ते सांगा नक्की..  आणि भाजी मध्ये घातलात की  खायला बोलवायला विसरू नका..

2 comments: