ते संकल्प वगैरे सुरु होतील ना उद्यापासून.. मग काय एक आठवडा पहाटे रस्त्यावर तुरुतुरु चालणाऱ्या लोकांचा पूर.. म्हणजे ढेरी कमी करणे ही संकल्पाची मुख्य जात आणि त्याला जोडून येणाऱ्या morning walk, gym, diet वगैरे संकल्पाच्या "पोट"जाती.. झालंच तर नोकरदार माणसांचा अजून एक ऐतिहासिक संकल्प म्हणजे या वर्षात प्रमोशन मिळाले पाहिजे.. बस इतकंच? खरं तर सुदृढ शरीर आणि आर्थिक स्थैर्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत.. तर हा लेख त्यांच्यासाठी, ज्यांना नवीन वर्षात काहीतरी वेगळे संकल्प करायचे आहेत पण हे दोन संकल्प सोडून दुसरे काही विशेष सुचत नाहीये.. २०२० वर्षाचे स्वागत करा या २० संकल्पातून..
- दिवसभरात टीव्ही चा वेळ आणि आवाज जितका कमी करता येईल तितका कमी करणे
- घरात असताना मोबाईल एका कोपर्यात ठेऊन देणे.. जसा पूर्वी landline असायचा..
- दिवसभरात ठराविक वेळ तरी कुठलाही व्यत्यय येऊ न देता कुटुंबाशी संवाद साधणे
- खळखळून हसणे, ढसाढसा रडणे अशा क्रिया अत्यंत नैसर्गिक असून न लाजता सातत्याने करत रहाणे
- नवीन मित्र जोडणे
- जुन्या मित्रांना आवर्जून भेटणे(भेटणे बरं का.. फोन किंवा whats app नाही.. )
- मित्र आणि couligue यामधील फरक ओळखणे
- सुंदर melody आणि lyrics असलेली गाणी ऐकणे
- छान कागदाचे पुस्तक हातात धरून वाचणे.. (कागदाचे पुस्तक म्हणजे e-book नको थोडक्यात)
- नातेवाईकांना आवर्जून वेळ देणे
- एखादे पत्र लिहिणे
- निसर्गाच्या जवळ नेणारी एखादी तरी ट्रिप करणे
- आपला छंद मुलांसमोर जोपासणे(एकही छंद नसेल लहानपणापासून, तर जास्त विचार करणे) मुलांसमोर यासाठी की ते अनुकरण करत असतातच की..
- दरमहा थोडी बचत करून पैसे गुंतवणे
- एखादे नवीन technical skill develop करणे
- कुठल्याही क्षणी आहे ती नोकरी जरी सोडायला लागली तरी उद्या काय याचा विचार करून ठेवणे
- वेगवेगळ्या policy, scheme यांची योग्य चौकशी करून भविष्य सुरक्षित करणे
- जेवण, झोप आणि व्यायाम यांच्या वेळा पाळणे
- आवर्जून पाठांतर करणे
- आत्मविश्वासाने जगणे
आता हे सगळं जर तुम्ही रोज करतच असाल तर मग काय करणार नवीन.. काही नवीन संकल्प वगैरे करू नका.. तुमचा सुखी माणसाचा सदरा फक्त पाठवून द्या..
आता म्हणाल एवढे फंडे मारत आहे तर तुझा काय २०२० चा संकल्प… तर एक ब्लॉग सध्या फार viral होत आहे.. "आमचे येथे नाविन्यपूर्ण संकल्प सुचवले जातील.." तर एक वाचक म्हणून वाचून बघते तो.. काही सुचतंय का.. !!!
बाकी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं का..!!! आणि हो जाता जाता अजून एक महत्वाचे.. नवीन वर्षात हा एक संकल्प अवश्य करा.. रोज वाचत रहा.. "तुमचेच रहाट गाडगे .. माझ्या लेखणीतून.." !!! -- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment