"आपलं घर भरलेलं असावं पोरी.. वेळ काही सांगून येत नाही.." आजी म्हणायची..
शेंगदाणे, कोरडे खोबरे, तीळ, जवस, कारळ, मिश्र डाळी यापैकी आलटून पालटून एक तरी चटणी घरी असावी..
आंब्याचे, लिंबाचे लोणचे, तक्कू, मोरंबा, साखरंबा, गुळंबा सगळ्या बरण्या फडताळात भरलेल्या असाव्या..
उडदाचे, बटाट्याचे, पोह्याचे, नागलीचे, तांदळाचे पापड, कुरडया, खारवड्या, चिकवड्या, सांडगे, भरलेल्या मिरच्या.. पत्र्याच्या डब्यात कागद लावून भरून ठेवलेले असावे..
"पानाची डावी बाजू अलगद सजते.. आपलं घर कायम भरलेलं असावं पोरी.. वेळ काही सांगून येत नाही.. "आजी म्हणायची..
सांडगे, डांगर, मेतकूट, बेसन, कुळीथ पीठ, येसर यांचे डबे भरलेले असावेत..
कडवे वाल, मूग, मटकी, वाटाणे, चणे, सोयाबीन, चवळी, कुळीथ, मसूर कडधान्याचे डबे भरलेले असावे..
हंगामात हरभऱ्याची, मेथीची एखादी तरी जुडी वाळवून ठेवावी..
तूर, मूग, उडीद, हरबरा, मसूर सगळ्या डाळी भरून ठेवाव्या.. वरणाला तर वापरता येतातच पण अडीनडीला पेंडपाला करायला पण कमी येतात..
"भाजी मिळाली नाही तरी पंधरवडा सहज काढता येतो पोरी..आपलं घर कायम भरलेलं असावं.. वेळ काही सांगून येत नाही".. आजी म्हणायची..
भाजणीचे, आंबोळीचे पीठ करून ठेवावे.. रवा, मिश्र धान्याचा दलिया, शेवया, कुरडयाचा चुरा, पोहे, चुरमुरे, राळे भरलेले असावे.. धिरडी, आंबील, उकडपेंडी, शेंगोळी चटकन बनतात घरी..
"नाश्त्याचे पन्नास प्रकार घरातल्या सामानात होतात पोरी.. फक्त आपलं घर कायम भरलेलं असावं.. वेळ काही सांगून येत नाही.." आजी म्हणायची..
"ओला, सुका दुष्काळ, अन्न टंचाई, पाणी टंचाई, महामारी येते आणि जाते..
जाता जाता माणसाला मोठी शिकवण देते..
जगरहाटी आहे पोरी भ्यायचं कारण काही नाही..
फक्त आपलं घर कायम भरलेलं असावं पोरी.. वेळ काही सांगून येत नाही.."
आजी म्हणायची..!!!
-- अवनी गोखले टेकाळे

जगरहाटी आहे पोरी भ्यायचं कारण काही नाही.. तयारी असली की खरंच काळजी कमी वाटते
ReplyDeleteGood.. Real & Futurepoof.. "Hari-Bol "
ReplyDeletesundar,saral lekhan.nirikshan n application cchan.ashich lihit raha.

ReplyDeletesundar,sarai lekhan.nirikshan n application cchan.ashich lihit raha.
ReplyDelete