मी नेहमी आनंदात असते कारण मी रोज लोकल ट्रेननी प्रवास करते..आधी खूप चिडचिड व्हायची, दगदग वाटायची.. आता मी त्यातच आनंद शोधला आहे.. लोकरीचे गुंडे, आवडीचे पुस्तक हे आता नेहमी असते बॅग मध्ये.. mobile मध्ये ठेहराव असलेली गाणी असतात.. यापलीकडे मग कधी हलका make-up करावासा वाटतो तर कधी नुसत्या बाकीच्या बायकांबरोबर गप्पा माराव्या वाटतात.. कधी एखादा विषय डोक्यात फिरत असतो लेख लिहिण्यासाठी तर कधी मटार निवडायचे असतात.. कधी ट्रेन मध्ये खरेदी तर कधी सोनचाफा दरवळत असतो.. कधी डोळे बंद करून नुसतं रडावसं वाटत तर कधी राहिलेली झोप पूर्ण करायची असते.... सगळे छंद पूर्ण करायचं हे ठिकाण.. माझा हक्काचा वेळ.. ही ७० मिनिटं..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment